शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महिलांसाठी १० सखी मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:06 AM

लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १० सखी मतदान केंद्रे राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १० सखी मतदान केंद्रे राहणार आहे.जालना लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान होणार आहे. १८ लाख मतदार २ हजार मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास ९ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागातर्फे चार टप्प्यात मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील दहा मतदान केंद्रे यंदा प्रथमच महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर महिला कामकाज पाहणार आहेत. या मतदान केंद्राला सखी असे नाव देण्यात आले आहे.यात जालना विधानसभा मतदार संघातील सेंट मेरी हायस्कूल, बदनापूर येथील जि.प. प्रा. शाळा दूधनवाडी, भोकरदन येथील मुलींची जि.प. प्रा. शाळा, जि.प. प्रा. शाळा पिंपळखुटा, सिल्लोड विधानसभा मतदार संघातील जोहर उर्दू शाळा, खोली क्र. १ आणि २, फुलंब्री विधानसभा मतदार संघासह अन्य ठिकाणी ही केंद्र राहणार आहेत.मतदान प्रक्रियेवर राहणार थेट नजरजालना : जालना जिल्ह्यात ३९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे की नाही, हे पाहण्यासाठी १६८ केंद्रावर थेट लाईव्ह वेब कॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जालना लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात ३९ संवेदनशील मतदान केंद्रावर प्रत्येकी एक अशा ३९ फोटोग्राफरची व्यवस्था करण्यात आली आहे. या १६२ मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात, राज्यनिवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त असा तीन ठिकाणी तीन मोठे टीव्ही लावल्या जाणार आहे.मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारुबंदी करण्यात आली आहे. कोणीही अवैधपणे दारु विक्री करतांना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात कोम्बींग आॅफरेशन करण्यात येत आहे. रात्री दहानंतर फिरणा-यांची कसून चौकशी होणार आहे.निवडणुकीसाठी वाहने रवाना

जालना लोकसभेची निवडणूक मंगळवारी होत आहे. यासाठी सोमवारी २२५ बसेस साहित्य घेऊन गावोगावी रवाना झाल्या आहेत. यापूर्वी निवडणूक विभागाच्या कर्मचा-यांनी मतपत्रिका घेऊन बसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती. दुसºया छायाचित्रात काही स्कूल बसचा देखील यासाठी उपयोग करण्यात आला. तर ६७४ जिप्स, ०३ टेम्पो, ट्रव्हलर १२ असे एकूण ९१४ वाहने साहित्य घेऊन विविध मतदान केंद्रावर सोमवारी सायंकाळी रवाना झाली. या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाWomenमहिला