लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.या सदंर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे एकूण ६७ लहानमोठे तलाव आहेत. या तलावातील बहुतांश तलावात मत्स्य संवर्धन होईल एवढे पुरेसे पाणी नसल्याने मत्स्य व्यावसायिकांनी आणलेले मत्स्य बीज पाण्यात सोडता आले नाही. विशेष म्हणजे मत्स्य बीज संवर्धनासाठी मत्स्य संवर्धन संस्थांना कोणत्या तलावात मत्स्य बीज सोडायचे आहे त्या तलावांची लिलावाद्वारे खरेदी ही जानेवारी महिन्यातच करावी लागते. यासाठी ६७ लाख रूपये मत्स्य व्यवसायिकांनी गुंतवले आहेत. यात १५७ लाख मत्स्य बोटकूळी टाकता आली असती आणि त्यातून चार हजार मेट्रीक टन उत्पादन निघाले असते. परंतू, या सर्व उत्पादनावर पाणी फेरले आहे.जालना जिल्ह्यात कतला, राहू, मरगळ आदी जातींच्या माशांची पैदास केली जाते. दरम्यान, शासनाने यंदा हा व्यवसाय संकटात सापडल्याने विशेष अनुदान द्यावे अशी मागणी भारसकर यांनी केली असून संस्थेचे भाग भांडवल वाढवून द्यावे, कोरड्या तळ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलतांना केली.मत्स्यबीज निर्मिती केंद्र बंद पडल्याने अडचण४जालना जिल्ह्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पामध्ये पुर्वी मत्स्य व्यवसाय विभागाकडून मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले होते. परंतू, त्या तलावात आता पूर्वी प्रमाणे मुबलक पाणीसाठा राहत नसल्याने हे केंद्र २०१३ पासून बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना जायकवाडी अथवा हैद्राबाद येथील मत्स्यबीज आणावे लागत आहेत.
मत्स्य व्यवसायिकांचे १२ कोटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:52 AM
जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठळक मुद्देजालना : मत्स्य व्यवसायिकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा