लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यातील देऊळझरी वाळू पट्ट्यात अवैधरीत्या वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्या २ जेसीबी, १३ ट्रॅक्टरविरूध्द जाफराबाद पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.देऊळझरी वाळू पट्ट्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा, वाहतूक सुरू आहे. यापूर्वी अनेक तक्रारी करूनही कारवाई करण्यात आली नव्हती. जाफराबाद पोलीस ठाण्याचे परिविक्षधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांच्या पथकाने बुधवारी दुपारी अवैध वाळू उपसा, वाहतूक करणा-या १३ ट्रॅक्टर, दोन जेसीबींविरूध्द कारवाई केली. वाळू चोरी करणा-या वाहन मालकांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती. या प्रकरणी संबंधितांविरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान, पोलीस पथकाने कारवाई करून धरपकड सुरू केल्यानंतर अन्य ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांनी वाहनासह तेथून पळ काढला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वीच अशी कारवाई आवश्यक होती.
१३ ट्रॅक्टर, २ जेसीबीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:36 AM