लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील उपविभागीय कार्यालया समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ १३ जणांनी मुंडण करून निषेध नोंदविला. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी यांना दिले़मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनकर्त्यानी उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलनाला सुरूवात केली या ठिकाणी शहीद काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, व पोलीस कर्मचारी श्याम काटगावकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी झालेल्या निषेध सभेत अनेक वक्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने निर्णय घेतला नसल्यामुळे समाजात सरकारच्या विरूध्द प्रचंड चीड निर्माण झाल्याचे सांगितले. त्यामुळे सुरेश तळेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, सुखदेव सिरसाठ, कैलास पुंगळे, केशव जंजाळ, विष्णू भालेराव, नवनाथ दौड, किशोर गाडेकर, साळुबा लोखंडे, कृष्णा आगळे, भगवान पालकर, बळीराम इच्चे, गजानन नागवे या तेरा जणांनी डोक्यावरचे केस काढुन मुंडण करून सरकारचा निषेध केला. यावेळी अनेक मान्यवरांनी मराठा समाजाला आरक्षण किती गरजेचे आहे, या बाबत मार्गदर्शन केले़गुरूवारी शिवाजी चौकात करण्यात येणाऱ्या चक्का जाम आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले़ यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चक्का जाम आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी युवकांची मोठी उपस्थिती होती.शहागडला रास्ता रोकोशहागड : मराठा आरक्षणासाठी कायगाव येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोचार्ला व शहागड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र पैठण फाट्यावर रस्ता रोको ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर बसस्थानका समोरील भारत पेट्रोलियम पंपासमोर दगडफेक करून औरंगाबाद कडून बीडकडे जाणा-या चार बसच्या काचा फोडल्या. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही.शहागड बंदच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, खासगी संस्था बंद ठेवण्यात आल्या. तर शहागडसह परिसरातील लाईट व इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. गावातील हनुमान मंदिरा पासून ते पैठण फाटा तीन किमीपर्यंत सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा आरक्षण मागणी बाबतीत घोषणाबाजी करत पायी गेला. पैठण फाट्यावरील चौकात रस्तारोको करत फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी ा मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रध्दांजली वाहण्यात आली. मराठा समाजाच्या मराठा आरक्षण मोचार्ला टिपू सुलतान युवा मंचचे अंबड तालुकाध्यक्ष सिराज काझी, व एमआयएम चे बाहोद्दीन सौदागर यांनी जाहीर पाठिंबा दिला.दरम्यान, काही अंदोलकांनी रोडवर टायर जाळले. पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगन, उपविभागीय अधिकारी देवेंद्र कटके, तहसीलदार दत्ता भारस्कर, एपीआय अनिल परजने, मंडाळाधिकारी परमेश्वर शिंदे, तलाठी कृष्णा मुजगूले, तलाठी अभिजीत देशमुख यांच्यासह पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तीन तासाच्या रस्तारोको मुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.बदनापुरात झुंजार छावाच्या वतीने तहसील बंद आंदोलनबदनापूर येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झुंजार छावाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. शासनाने मराठा समाजास लवकरात लवकर आरक्षण दयावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालय बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी झुंजार छावाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या निषेधार्थ १३ तरूणांचे मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:02 AM