लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध गावांमधे बदनापूर पोलीसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून न्यायालयाचे अटक वॉरंट बजावलेल्या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले.तालुक्यात पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी १३ मार्च रोजी रात्री अचानक कोम्बिंग आॅपरेशन सुरू केले, यात तालुक्यातील वरूडी, नानेगाव, दाभाडी, काजळा, ढोकसाळ या गावांमध्ये न्यायालयाचे अटक वॉरंट असतानाही न्यायालयात हजर झाले नसलेल्या एकूण १४ आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. तसेच तालुक्यातील राजेवाडी, काजळा, लक्ष्मणनगर तांडा, नागेवाडी येथील चार फरार आरोंपीना अटक केली, या सर्वांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले़या कोम्बिंग आॅपरेशनमधे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, सहायक पोनि़ पी. एस. बोलकर, राजपूत, पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पाटील यांच्यासह येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.या कारवाईसाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पोलीस ठाण्याअंतर्गत प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग आॅपरेशन करून कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
कोम्बिंग आॅपरेशनमधे १४ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:28 AM