जालना : जिल्ह्यातील १४ जणांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. तर कोरोनामुक्त झालेल्या १५ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी केलेल्या २,१३५ नमुन्यांचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पॉझिटिव्हिटी रेट ०.६६ आता आहे. आरटीपीसीआरच्या १,७५८ तपासणीत अहवालात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट ०.६ आहे. तर ३७७ अँटिजन तपासणीत तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या तपासणीचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८० आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा समावेश आहे. परतूर तालुक्यातील वडगाव १, घनसावंगी शहर १, आरगडे गव्हाण १, पिंपरखेड १, तीर्थपुरी १, अंबड शहर २, एकलहरा १, झिर्पी १, चुर्मापुरी येथील दोघांना बाधा झाली आहे. भोकरदन शहर १, राजूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील संस्थात्मक अलगीकरणात दोघांना ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ३५९ वर गेली असून, त्यातील १,१७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ११५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.