बदनापूर : देशगव्हाण ता. अंबड येथील लग्न लावून साताळा ता. जि. औरंगाबाद कडे जात असलेले एक वाहन उलटल्यामुळे पंधरा जण जखमी झाले असून, यात वृध्द महिला, पुरूष आणि बालकांचा समावेश आहे.औरंंगाबाद जिल्ह्यातील चौकाजवळील साताळा येथील व-हाड देशगव्हाण येथे लग्नासाठी गेले होते. १२ जून रोजी दुपारी लग्न लावल्यानंतर व-हाडाला घेवून जाणारी एक जीप देशगव्हाणहून साताळाकडे निघाल्यानंतर एका वळणावर हे वाहन पलटी झाले.त्यामधे असलेल्या महिला पुरूष व बालकांना डोक्याला हाताला,पायाला मार लागल्याने जखमी झाले. अपघातात राधाकिसन विठ्ठल काळुसे (२६), रा. साताळा, किसन शंकर सांगळे (६५) रा.चौका, आशाबाई देवीदास घुगे (५५) रा, साताळा, पंढरीनाथ नामदेव साळवे (५०) रा साताळा चौका ,नारायण सतिष सांगळे वय ३५ रा. साताळा, विठ्ठल सखाराम काळुसे (७०) साताळा, कार्तिक रामदास सांगळे ,(वय ८) निखील आर. सांगळे (वय १२,) सतिष नारायण सांगळे ,(वय १२), अनिकेत दत्तु काळुसे (वय १२,) गंगुबाई बाबुराव घुगे (६०) कुकरा ता. फलंब्री, सखुबाई नारायण घुगे (६५) रा नागापूर ता. कन्नड, अनिता भीमराव सोनवणे (४०) रा. नागापूर ता .कन्नड आदींचा जखमीमध्ये समावेश आहे.
लग्नाच्या व-हाडाची जीप उलटून १५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:23 AM