जालना : लायन्स क्लबच्या वतीने रविवारी आयोजित शिबिरात १५० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ३५ जणांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले असून, त्यांच्या डोळ्यांवर लायन्स क्लबच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्षा मिनाक्षी दाड यांनी दिली.
या शिबिरात प्रारंभी रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ. गायकवाड आणि त्यांच्या टीमने जिल्हाभरातून आलेल्या १५० जणांची नेत्र तपासणी केली. त्यातील ३५ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. लायन्स क्लबच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या व चौथा रविवारी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पुढील शिबिर ८ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे दाड यांनी सांगितले. यावेळी क्लबच्या सचिव जयश्री लड्ढा, कोषाध्यक्ष प्रेमलता लोया, रिजनल चेअरमन अतुल लड्ढा, श्याम लोया, प्रकल्प प्रमुख विजय दाड, डॉ. गिरीश पाकनीकर, अरुण मित्तल, बलिराम बेंद्रे, द्वारकादास मुंदडा, वंदना मुंदडा, डॉ. रोहित कासट, डॉ. माधुरी पाकनीकर, लॉ. बबिता लोहिया, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. राजकुमार सचदेव, डॉ. सतीश गोयल, डॉ. कुरील, कैलाश भरतीया, राजेश शर्मा आदींची उपस्थिती होती.