शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जालन्यात अनुकंपा तत्त्वावर १६ जण झाले तलाठी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

By दिपक ढोले  | Published: July 14, 2023 8:21 PM

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

जालना : शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्याचा शासन निर्णय आहे. जालना जिल्ह्यासाठी नव्याने ८० तलाठी साजे निर्मिती करण्यात आले असून, शासनाने व विभागीय आयुक्तांनी या तलाठी साजावर २० टक्के नियुक्ती देण्याचे कळविले आहे. यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील अनुकंपा तत्त्वावर एकूण १६ उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनात तलाठी हा ग्रामस्तरावरील महत्त्वाचा घटक असून, महसूल प्रशासनाचा तो कणा आहे, त्यामुळे नियुक्त झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे उत्तम काम करावे व नागरिकांना चांगली सेवा द्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांना मिळाले नियुक्तीपत्रजालना जिल्हा आस्थापनेवरील महसूल गट-क व सामायिक गट-क संवर्ग अनुकंपा प्रतीक्षा यादीतील धनराज पांडुरंग धुमाळ, राजेंद्र एकनाथ पंडित, गणेश पुंडलिक गायकवाड, महमंद हारेस महमंद कमरोद्दीन, अर्चना भागवत जाधव, अक्षय रवींद्र कुलकर्णी, विशाल सुरेश दळवी, शंकर कोंडिबा दुर्गमवार, आनंद पांडुरंग पंचांगे, विनोद श्रीराम कांबळे, अशोक भानुदास गायकवाड, रूपाली विनोद यादव, विठ्ठल सर्जेराव घुले, रूपाली दिलीप जगदाळे, ज्योती सतीश अवकाळे आणि रंजना रविकिरण वैद्य या उमेदवारांना नियुक्तीपत्राचे आदेश वितरित करण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना