शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:41 AM

मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक चोखपणे पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदारांच्या मनातील शंका- कुशंका यांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. या मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.अनेकदा मतदार निवडणूक केंद्रावर गेल्यावर मतदान यादीत नाव नसणे, चुकीचे नाव असणे, पत्यात बदल असणे या सारख्या असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. मतदारांच्या समस्या सोडता याव्यात, यासाठी ०२८२१९५० या हेल्पलाईनची सुविधा १७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर ७४ कॉलची नोंद झाली होती. १ फेबु्रवारी ते १ एप्रिलपर्यंत १५२७ तर मंगळवारी एक दिवसात जवळपास ३० कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. असे १७ जानेवारी ते २ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत १६३० कॉलची नोंद झालेली आहेत.या हेल्पलाईन कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. जालना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.मतदार याद्या बिनचूक तयार व्हाव्यात, यासाठी या हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. यात नवमतदार आमचे यादीत नाव आहे का याची व ओळखपत्रासंबंधी विचारपूस करत आहेत.यावेळी त्यांना त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नावात बदल करण्यासाठी काय करावे, पत्त्यात बदल, चुकलेला फोटो असल्यास तो बदलणे, मतदान केंद्र आदींबाबत या क्रमांकावर मतदार प्रश्न विचारत आहेत. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातात. दरम्यान, मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना येणाऱ्या अडचणी यामुळे सुटण्यास मदत होत आहे. त्यातच अनेकांनी आपले नाव मतदार यादीत आले नसल्याच्या तक्रारी या हेल्पलाईनवर मोठ्या आल्या असल्याची माहिती निवडून विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली आहे. काही तक्रारी असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वातावरण तापतेयलोकसभेची निवडणूक २० दिवसांवर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात मतदारराजाही सज्ज आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी विविध अडचणी येतात. मतदारांची असुविधा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सदर हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत १६३० मतदारांनी आपल्या विविध अडचणीसंदर्भात नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग