जालना : येथील राहत सोशल ग्रुपच्या वतीने रविवारी डॉ. फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाली.विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुरेश अग्रवाल यांची तर माजी आ. कैलास गोरंट्याल, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, मौलाना कारी मोहम्मद अली, मौलाना इकबाल सिकंदर, इकबाल पाशा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बद्रर चाऊस मोहन इंगळे, विष्णू पाचफुले, आरेफ खान, अजहर बिल्डर, आमेर पाशा, शेर जमा खान, विनित साहनी, राजू बनकर, डॉ. मशीर इनामदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.हाफीज सय्यद असरार यांनी कुराण पठण केले आणि बशारत अली खान यांनी नातेपाक सादर केले. मौलाना कारे मोहम्मद अली म्हणाले, की, विवाह सरळ आणि स्वस्त खर्चात झाला पाहिजे, इस्लाम धर्मात याची ताकीद देण्यात आलेली आहे.उपस्थितांनी या वेळी १६/११ हल्ल्याती शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. निकाहची कारवाई शहर काजी नुरोद्दीन व काजी बिलाल यांनी पूर्ण केली. या वेळी जिशान खान, सय्यद निजाम, फेरोज सौदागर, हाजी मुस्तफा, कलीम खन, शशिकांत घुगे, ज्ञानेश्वर ढोंगरे, सतीश जाधव, डॉ. अतिक खान, बशारत अली खान, करीम बिल्डर, सिध्दीविनायम मुळे, देविदास देशमुख यांची उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी राहत सोशल गु्रपचे अध्यक्ष शेख अफसर शेख, सचिव लियाकत अलीखान यासेर, उपाध्यक्ष सलीम यासिमखान पठाण, शेख सलीम शेख मोहम्मद, मोहम्मद सलीम मोमीन, सय्यद अख्तर, मोहम्मद साहब, सय्यद साकेर, शेख महेबूब, एतेशाम मोमीन, अहेमद जागीरदार, शहीद जागीरदार, शेख सलीम, शेख महेबूब, नईम पहेलवान, सलामत अली खान, शेख फईम खान, शेख अख्तर, शेख अराफत, शेख खालेद, अमजद खान, अलीम खान, मजहर सौदागर, खिजर फारुक, कलम खान, शहाबाज खान, रफीक मोहम्मद, अहेमद जहागीरदा, शेख एजाज, शेख मुजीब, शेख औसाम यांनी परिश्रम घेतले. लियाकत खान यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अब्दुल मुक्तदीर यांनी आभार मानले.
सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:36 PM