जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरुवारी मृत्यू झाला, तर गुरुवारीच १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २४ जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ५३२वर गेली असून, आजवर ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १२ हजार ९९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली. मंठा तालुक्यातील उमरखेड एक, तर अंबड शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर शहरातील एकास कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील जानेफळ एक, तर बुलडाणा जिल्ह्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली. भोकरदन शहरातील दोन, तर तालक्यातील जवखेडा १, राजूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९ हजार ६६८ जण संशयित असून, गुरुवारी ८०९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.