लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सर्व अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळा व विद्यालयांंनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात जालना जिल्ह्यातील १८९ विद्यालये व ९ शाळांनी सहभाग घेतला. या बंदमध्ये ३३४ शिक्षकांनी सहभाग घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी दिली.ज्या शाळांंना या अगोदर २० टक्के अनुदान दिले. मात्र, त्यांना पुढील कोणताच टप्पा मिळाला नाही. त्यांना रखडलेले टप्पे त्वरित मिळावे, अघोषित शाळा व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज यांना घोषित करुन अनुदान सुरु करावे. १८ वर्षांंपासून अनेक शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. त्यांना त्वरित वेतन सुरू करावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर हे आंंदोलन करण्यात आले आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रलंबित निर्णय घ्यावेत, या मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.परतूर तालुक्यात शाळा बंद ठेवून केले आंदोलनपरतूर : राज्य (कायम ) विना अनुदानित शाळा कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी दि. ५ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने सोमवारी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या कृती समितीने दिला आहे.२० टक्के अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार पुढील अनुदान मंजूर करावे, विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, २०१२ च्या नैसर्गिक वाढीच्या तुुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी अमित जवळेकर, महेश लाहोटी, नसीर खतिब, परिमल पेडगावकर, निंबाळकर ए. बी. वाघमारे आर. एच आदींची उपस्थिती होती. आंदोलनामुळे शहरातील संस्थांच्या शाळा सोमवारी सोडून देण्यात आल्या होत्या. मागण्यांचे निवेदन एस. के. कुलकर्णी यांनी स्वीकारले.
१८९ विद्यालये, ९ शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:15 AM