जालना : मार्च महिन्याच्या मध्यावधी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवरून पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, १९६९.४९ हेक्टर वरील जिरायत, बागायत, फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. नुकसान भरपाईपोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
मागील महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होत. या पावसाचा रब्बीतील पिकांसह बागायत क्षेत्र, फळपिकांना मोठा फटका बसला होता. झालेल्या नुकसानीची लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील नुकसान अनुदानाचे पंचनामे करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तालुकास्तरावरून प्राप्त झालेल्या प्रशासकीय अहवालानुसार एकूण १९६९.४९ हेक्टरवरील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर त्याच्या नुकसानीपोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार ६१५ रूपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. यात पाच हेक्टरवरील जिरायती पिकांचे, १३५५.६२ हेक्टरवरील बागायतीचे तर ६०८.८७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद केले आहे.
जिरायतीसाठी हेक्टरी साडेआठ हजाराची मागणीजिरायती पिकांच्या नुकसानीपोटी प्रति हेक्टरी ८५०० रूपये प्रमाणे ४२ हजार ५०० रूपयांची मागणी करण्यात आली आहे. बागायतीसाठी प्रति हेक्टरी १७ हजार प्रमाणे २ कोटी ३० लाख ४५ हजार ५४० रूयांची मागणी करण्यात आली आहे. तर फळपिकांसाठी प्रति हेक्टरी २२ हजार ५०० प्रमाणे १ कोटी ३६ लाख ९९ हजार ५७५ रूपयांची मागणी करण्यात आली आहे.
चार तालुक्यांत नुकसानीची नोंद नाहीगत महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वाळी वाऱ्यामुळे जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या चार तालुक्यांतील जिरायती पिके, बागायती, फळपिकांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासकीय दप्तरी आहे. परंतु, परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची नोंद ३१ मार्च अखेरच्या अहवालात दिसून येत नाही.
जाफराबाद तालुक्यात हरभऱ्याला फटकाजाफराबाद तालुक्यातील पाच हेक्टरवरील हरभरा पिकाला अवकाळीचा फटका बसला आहे. याच्या नुकसानीपोटी ४२ हजार ५०० रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्याशिवाय ८७.४५ हेक्टरवरील बागायतीलाही या अवकाळीचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अशी आहे नुकसानीची स्थितीतालुका- जिरायती- बागायती- फळपिके-एकूणजालना-००-११६८- ५९०- १७५८बदनापूर-००-८२.४७- १८८७- १०१.३४भोकरदन-००- १७.७०-००- १७.७०जाफराबाद- ५.००- ८७.४५-०० ९२.४५परतूर-००-००-००-००मंठा-००-००-००-००अंबड-००-००-००-००घनसावंगी-००-००-००-००एकूण -५.००-१३५५.६२-६०८.८७ -१९६९.४९