शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

२० उमेदवार आजमावणार नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:44 AM

जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. परंपरागत चिन्ह देतानाच लॅपटॉप, ट्रॅक्टरसह शिट्टी आणि कपबशी, दूरदर्शन, रोडरोलर अशी अनेक चिन्ह अपक्षांना मिळाल्याने प्रचाराची रंगत वाढणार असल्याचे चित्र आहे.सोमवारी पात्र ठरलेलय उमेदवारांमध्ये काँग्रेसकडून विलाास औताडे. हाताचा पंजा, भाजपकडून रावसाहेब दानवे -कमळ, महेंद्र कचरु सोनवणे बहुजन समाज पार्टी-हत्ती, उत्तम धनु राठोड, आसरा लोकमंच पार्टी-बॅटरी, गणेश शंकर चांदोडे, अखिल भारतीय सेना-गॅस सिलेंडर, त्रिंबक बाबूराव जाधव, स्वतंत्र भारत पक्ष-कप आणि बशी, प्रमोद बाबूराव खरात, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-एअर कंडिशनर, फेरोज अली, बहुजन मुक्ती पार्टी-खाट, डॉ. शरदचंद्र वानखेडे, वंचित बहुजन आघाडी- शिट्टी, अण्णासाहेब देविदास उगले, अपक्ष-बॅट, अनिता लालचंद खंदाडे (राजपूत), अपक्ष-दूरचित्रवाणी, अरुण चिंतामण चव्हाण, अपक्ष-पेनाची निब सात किरणांसह, अहेमद रहिम शेख, अपक्ष-आॅटो रिक्षा, ज्ञानेश्वर नाडे अपक्ष-ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, योगेश दत्तू गुल्लापेल्ली, अपक्ष-लॅपटॉप, रतन आसाराम लांडगे, अपक्ष-करनी, राजू अशोक गवळी, अपक्ष-रोड रोलर, शहादेव महादेव पालवे, अपक्ष-चावी, सपकाळ लीलाबाई धर्मा, अपक्ष-गॅस शेगडी आणि शाम सिरसाठ अपक्ष- यांना हातात ऊस घेतलेल्या शेतकऱ्याचे चिन्ह मिळाले आहे.जालना : असाही ‘लकी ड्रॉ’सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासह चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात अखिल भारतीय सेनेचे उमेदवार गणेश चांदोडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक निशाणी म्हणून कपबशीला प्राधान्य दिले. दोन उमेदवारां प्रमाणे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. त्र्यंबक जाधव यांनी देखील कपबशी ही निशाणी मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यामुळे यावेळी चिठ्ठी टाकून चिन्ह काढण्यात आले. त्यात चांदोडे यांना कपबशीची चिठ्ठी निघाल्याने डॉ. वानखेडे यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले, तर अ‍ॅड. जाधव यांना गॅस सिलिंडरची निशाणी देण्यात आली.स्टार प्रचारकांच्या दौऱ्यांकडे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदारसंघात सोमवार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खºया अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला आहे. आता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे. प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेकडून त्यांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार असून, काँग्रेसकडूनही अशीच तयारी सुरू असल्याचे बोलले जाते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकरांची सभाही जालन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले. ते यापूर्वी महिन्याभरापूर्वीच जालन्यात येऊन गेले होते.जालना लोकसभा मतदारसंघाचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. निवडणूक रिंगणात २० उमेदवार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दोन बॅलेटमशीन लागणार असून, व्हीव्हीपॅटचे नवीन आदेश येईपर्यंत संभ्रम कायम आहे. सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन ५० टक्के व्हीव्हीपॅटच्या मशीन वाढवाव्यात असे सूचविले आहे. परंतु अद्याप पूर्ण निर्णय आमच्या पर्यंत न आल्याने आम्ही त्या बद्दल सध्या बोलणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले.जालना लोकसभा मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेने शेतकरी संघटनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण वडले यांना जाहीर केले आहे. आता वडलेंची चांगलीच गोची होणार असून, शिवसेना-भाजप युती नसताना त्यांनी दानवेंवर कोणत्या भाषेत टीका केली, हे नागरिक अद्यापही विसरलेले नाहीत.त्यातच आता त्यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांना करावे लागणार असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे. अशी गत राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची होणार आहे. त्यांनी देखील दानवेंशी दोन हात करण्याची गर्जना केली होती.मात्र, ती नंतर त्यांनी तलवार म्यान केल्याने आता त्यांनाही फिरसे दानवे... असे म्हणत फिरावे लागत आहे.दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघात येणारा सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण थंड झाल्याने त्याचा लाभ आता अप्रत्यक्षपणे विलास औताडेंना होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग