जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. तर रविवारीच २१९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या ६६ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या जिल्ह्यात कायम आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल २१९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात जालना शहरातील तब्बल ११६ जणांचा समावेश आहे. शिवाय माळी पिंपळगाव १, इंदेवाडी २, दहिफळ काळे १, हिवरा १, नेर ४, बोरखेड २, खापरखेडा २, दादावाडी १, सावरगाव १, अंतरवाला १, हिवरा रोशनगाव १, टाकरवन १, पठण बु १, वाघूळ १, गोंदेगाव १, पळसखेडा १, शेवगा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहर २, बेलोरा २, उसवद १, वाई २, परतूर तालुक्यातील वाटूर ४, आष्टी ३, पाटोदा १, वरफळवाडी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी १, चिंचोळी १, सरफ गव्हाण १, देवी हदगांव १, राम गव्हाण १, अंबड शहर ७, शेवगा ३, गोंधळपुरी १, मसाई तांडा १, बाणगांव १, घुंगर्डे हदगांव २, वागलखेडा १, बदनापूर तालुक्यातील शेलगाव १, धोपटेश्वर १, किन्होळा १, असरखेडा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी १, जवखेडा ५, माहोरा २, अंबेगाव १, भारज २, हनुमतखेडा १, भोकरदन तालुक्यातील माळखेडा १, बरंजळा लोखडे २, सुंदरवाडी १, अलापूर ७, लालगढी येथील एकाला बाधा झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सहा, औरंगाबाद जिल्ह्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे १९ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
मयतांची संख्या ४०३ वर
जिल्ह्यात आजवर १६ हजार ६४७ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ४०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर आजवर १४ हजार ९७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर अद्याप १,२६९ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.