सरकारी रुग्णालयास प्राधान्य : येथे बेड नसल्यास खाजगीचा पर्याय
लाेकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनाची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे रुग्ण आणि रुग्णवाहिका चालकांची दमछाक होत आहे. प्रारंभी जिल्हा सरकारी रुग्णालय आणि कोविड रुग्णालयात गंभीर रुग्णांना उपचारासाठी हलविले जाते. परंतु, तेथे बेड नसल्यावर हीच रुग्णवाहिका खासगी रुग्णालयाकडे वळविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
जालना शहर आणि जिल्ह्यात जवळपास २७ मोठ्या रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे या खासगी रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढीमुळे बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात तेथेही बेड न मिळाल्यास पुन्हा तिसरे रुग्णालय गाठावे लागत असल्याचे वास्तव रुग्णवाहिका चालकांनी सांगितले. काही ठिकाणी रुग्णांना रुग्णवाहिकेतच तपासले जाते. परिस्थिती गंभीर असेल तर पुन्हा सरकारी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत डॉक्टरविनाच ने-आण केली जात असल्याचे दिसून येते.
१८ फेऱ्या झाल्या
कोरोना काळात रुग्णवाहिकेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेड मिळत नसल्याने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती रुग्णवाहिकेचे मालक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
२२ फेऱ्या झाल्या
शहरासह औरंगाबाद येथे रुग्णांची ने-आण करावी लागत आहे. कोरोनामुळे आम्हाला दिवसरात्र तत्पर राहावे लागत आहे. या काळात बेड उपलब्ध नसल्याने फेऱ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती रुग्णवाहिकेचे मालक विवेक भाले यांनी दिली.
२२ फेऱ्या झाल्या
शहरासह औरंगाबाद येथे रुग्णांची ने-आण करावी लागत आहे. कोरोनामुळे आम्हाला दिवसरात्र तत्पर राहावे लागत आहे. या काळात बेड उपलब्ध नसल्याने फेऱ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती रुग्णवाहिकेचे मालक विवेक भाले यांनी दिली.