लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर चार दिवसात १६ शेतकऱ्याकडून २१५ क्ंिवटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेले शेतकरी हमीभाव केंद्रावर गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.हमीभाव केंद्रावर सोयाबीन, तूर आणि आता हरभरा सुध्दा निकषानूसारच खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १० ते १२ क्विंटल हरभ-याचे उत्पादन निघाले आहे. हरभ-याला शासनाने ४४०० रूपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. सुरुवातीला आॅनलाईन नोंदणी करूनही हरभ-याची खरेदी सुरू करण्यात आली नाही. परिणामी अनेक शेतक-यांना कमी दरात व्यापा-यांना हरभरा विकावा लागला. आता बाजार समितीच्या केंद्रावर दीडहजारांवर शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. नऊ एप्रिलपासून प्रत्यक्ष हरभरा खरेदीस सुरुवात झाली असून, २१५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. दररोज केवळ दहा-पंधरा शेतक-यांना मेसेज पाठवून खरेदीसाठी बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारून अधिका-यांकडे विचारणा करत आहेत.
तीन दिवसांत सव्वादोनशे क्विंटल हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:09 AM