जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना २४ तास सेवा देण्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने केली जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. त्यांना पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारपासून दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि. आशिष खांडेकर यांनी दिली.
सरकारची सुपारी घेवून बोलू नकासरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्या सारख्यांना शोभत नाही. आमच्या पोरांना आरक्षण म्हणजे काय आणि आमच्या विरोधात कोण बोलतं हे सगळं कळतं. आमच्यात फूट पाडण्याचे तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला. राज ठाकरे यांना मानणारे समाजात अनेक आहेत. त्यांच्यात गैरसमज पसरवू नयेत, असेही ते म्हणाले.