लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील राहत सोशल ग्रुपच्यावतीने रविवारी जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात २५ जोडप्यांचा विवाह पार पडला. राहत संस्थेकडून गेल्या १५ वर्षापासून अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला जात असल्याचे सांगण्यात आले.हा सोहळा डॉ.फे्रजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक शिलवंत ढवळे, मौलाना मोहम्मद अली, मुप्ती अब्दुल रहमान, विनायक महाराज फुलंब्रीकर, धर्मदाय कार्यालयाचे एस.डी. अग्निहोत्री, ए.जी. नळणीकर यांच्यासह मोहन इंगळे, बदर चाऊस, विनीत साहनी, मो.फेरोज सौदागर, रियाज भाई, फेरोज भागवान, संदीप तोतला, मुजल्बा , अयुब खान, शेख महेमुद, डॉ.कामरान खान, सादेक शेख कुरेशी, पांडूरंग क्षिरसागर, विनोद रत्नपारखे,अब्दुल करीम बिल्डर, शेख जमा खान, मो.फेरोज, विनोद रत्नपारखे, शेख नावेद, सेवली, हाफीज सैय्यद असदार यांनी कुरान पठण केले.
सामूहिक सोहळ्यात २५ जोडपे विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:59 AM