शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:49 AM

खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे, शेतीमालास भाव नाही, शेतीची झालेली दयनीय अवस्था, यामुळे बँकाकडे शेतजमिनी गहाण पडलेल्या आहेत.खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार तांगडे यांनी केले. त्यांनी रविवारी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनास भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विदारक चित्र मांडले.रविवारी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला. रविवारी २५१ जणांनी आरक्षणाची घोषणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काच...नाही कुणाच बापाच...एक मराठा..लाख मराठा..अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी दोन दिवस (ता.८) पर्यंत मुंडण आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर सर्व गोळा केलेली केस हे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत.नाटककार राजकुमार तांगडे, सिने कलावंत, दिग्दर्शक संभाजी तांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला. राज्यकर्त्यांकडुन होत असलेली दिशाभूल, तकलादू घोषणांची न होणारी अंमलबजावणी जाती-जातीत संघर्ष पेटविण्यासाठी केलेला बुध्दीभेद या सगळ्यांची चिरफाड करत राजकुमार तांगडे यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला. महाबंपर नौकर भरतीस अडवू नका असे म्हणणाºयांनी चार वर्षात ज्या तरूणांचे वय निघून गेले, त्यांच्या भवितव्याचा विचार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून रक्ताचे पाणी करत उभारलेला लढा सुरू ठेवावा या लढ्याच्या यशानंतर शेतमालासाठी असाच लढा उभारण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. संभाजी तांगडे यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवरायांनी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्ष साकारली याचे वर्णन केले. यावेळी समाज बांधवांसह तरूण, महिला व विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना : गोळेगाव येथील नदीपात्रात तरूणांचे आंदोलनआष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारी सकाळी गोदवरी नदीपात्रात जाऊन आंदोलन केले. यावेळी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांनी हे मागण्यांचे निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठविण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी चोख बंदोस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन