शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

२६ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 PM

चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या २६ लाख ४५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा किनगावराजा (जि.बुलडाणा) पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

देऊळगाव राजा : चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या २६ लाख ४५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा किनगावराजा (जि.बुलडाणा) पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की रविवारी रात्री किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त सुरू असताना, बुलडाणा येथील नियंत्रण कक्षातून नाकाबंदी करण्याबाबत संदेश प्राप्त झाला. वाशिम येथून काही जण चोरी करून एका कारने मेहकर-सिंदखेडराजा रस्त्याकडे येत असून किनगाव येथील राज्य मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले. त्यानुसार किनगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी यांनी कर्मचा-यांसह दुसरबीड टोल नाक्यावर मध्यरात्री दोन वाजता नाकाबंदी सुरू केली. सिंदखेडराजाकडून आलेली संशयित कार (एमएच-२८,एएन २१९५) पोलिसांना दिसली. पोलिसांनी कार थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, तो घाबरत बोलू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली. मागील बाजूस वायरच्या पिशवीमध्ये हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या २६ लाख ४५ हजारांच्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी कारसह नोटा जप्त करून सादिक खान मोहंमद अलीखान (रा.नांदुरा), पार्थ अविनाश लोंढे (अकोला), मुकेश गोकुळ पाटील (खामगाव), मो. साबीर शेख युसूफ, प्रशांत भुजंगराव निंबाळकर (नांदुरा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नोटा कोठून आणल्या, कुठे नेणार याबाबत समाधानकारक माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.