लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा केवळ ६२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईसह चारा टंचाईने शेतकरी तसेच पशुपालक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने पाणी टंचाईचा ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. तर चारा उत्पादनासाठी देखील नियोजन केले आहे. जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८६ मि.मिलमीटर एवढी आहे. असे असताना केवळ ४२४ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाताील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, रबी हंगामातही जिल्ह्यात यावेळी केवळ १९ टक्के पेरणी झाली आहे. याचे मोठे नुकसान चारा निर्मितीला बसले झाले आहे. चाऱ्याचे आजचे भाव हे कधी नव्हे वाढलेले आहेत. एक पेंडी थेट २० रूपयांना विकली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने ज्याकाही गाळपेºयाच्या जमिनी आहेत तेथे मका चारा निर्मिर्तीला भर दिला आहे.त्यासाठी वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचारही प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.जालना जिल्ह्यात चारा पे-याचे क्षेत्र दोन लाख ६९ हजार हेक्टर असल्याचे सांगण्यात आले.या पे-यात चारा निर्मिती करून त्यातून तीन लाख मेट्रीक टन चारा निर्मिती होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न तर सुटेल, परंतु जनावरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे करावे, या चिंतेत आता पशुपालक आणि प्रशासन असल्याचे सांगण्यात आले.उसाचा पर्याय ठरू शकतो साह्यकारीचाराटंचाईवर मात करण्यासाठी उसाचा पर्याय असून, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात उसाचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. ऊस तोडून जो वरील हिरवा भाग राहतो, त्याचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी अनेक शेतकरी करतात. त्यामुळे एक ते दोन महिने हा उसाचा अर्थात वाडे चा-याला पर्याय ठरू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा रबी पेरणीत ज्वारी आणि बाजरी नसल्याने पुढील वर्षी चाराटंचाई आणखी गंभीर होऊ शकते.
३ लाख मे. टन चारा उत्पादनाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:42 AM