आन्वा : कुठलाही रजाअर्ज अथवा विनंती न करता आन्वा (ता.भोकरदन) येथील श्री आजूबाई प्राथमिक शाळेतील तीन शिक्षक आठवडाभरापासून गायब आहेत. संस्थेने पाठविलेल्या नोटिसीलाही शिक्षकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शाळेचा भार सध्या एकाच शिक्षकावर आहे.भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे श्री आजूबाई प्राथमिक विद्यालय असून, याठिकाणी कार्यरत असलेले तीन शिक्षक गत आठ दिवसांपासून गैरहजर आहेत. याबाबत त्यांनी विद्यालयास कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने मुख्याध्यापकाला स्वत:च सर्व वर्ग सांभाळावे लागत आहेत. गैरहजर असलेले सहशिक्षक डी.बी. काळे, ए.बी.चव्हाण व एस.आर. अराख यांना मुख्याध्यापकांनी नोटिसा देखील बजावल्या. परंतु संबंधितांनी या नोटिसीला कुठलेही उत्तर दिले नाही, तसेच शाळेतही हजर झाले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार करुन या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत मुख्याध्यापक प्रशांत काकळे म्हणाले, की वरील तिन्ही शिक्षक कुठलाही रजा अर्ज किंवा पूर्वसूचना न देता गैरहजर आहेत. याबाबत वरिष्ठांना लेखी कळविले आहे.
तीन गुरुजींनीच केली ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:26 AM