शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जालन्यात ३० किलो चांदी जप्त; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 4:01 PM

कारसह संबंधित चौघांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात नेऊन कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देएका कारमध्ये औरंगाबाद येथून नांदेडकडे चांदी नेण्यात येत होतीया कारवाईत तब्बल २६ लाख ८० हजार ३३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त

जालना : एका कारमध्ये नेण्यात येत असलेली ३० किलो चांदी दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई शनिवारी सकाळी नागेवाडी टोलनाक्याजवळ (ता.जि. जालना) करण्यात आली. या कारवाईत तब्बल २६ लाख ८० हजार ३३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीची वाहतूक सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने शनिवारी सकाळी नागेवाडी टोलनाक्याजवळ सापळा लावला. त्यावेळी आलेल्या एका कारला (क्र. एम.एच.२०- ई.जे.६८९१) थांबविण्यात आले. कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये दोन पिशव्या आढळून आल्या. त्यात चांदीचे ३० किलो वजनाचे १५ गट्टू होते. पोलिसांनी कारमधील प्रवीण नंदलाल भोमा (रा. कुंभारवाडा औरंगपुरा, औरंगाबाद), कार चालक अस्लमखान मसुदखान (रा.बेगमपुरा औरंगाबाद), मनोज ओमप्रकाश वर्मा (रा. देवानगर औरंगाबाद), सय्यद फारूख सय्यद हमीदोदीन (रा. रहिमानियाँ कॉलनी, औरंगाबाद) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चांदी, कार असा २६ लाख ८० हजार ३३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वरील चौघाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रमोद बोंडले हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गंदम, फौजदार प्रमोद बोंडले, दहशतवाद विरोधी पथकातील अंकुश राठोड, शेख रशीद, दिनेश बरडे, संजय गवळी, राजू घुगे, अभिजित अडीयाल, तौसिफ पठाण, अनिल काळे यांच्या पथकाने केली.

औरंगाबादहून नांदेडकडे वाहतूककारमध्ये सापडलेली ३० किलो चांदी ही औरंगाबादहून नांदेडकडे नेण्यात येत होती. संबंधित चौघांकडे कागदपत्रांसह इतर बाबींची विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यामुळे त्या चौघांची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस