शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

३११ महिलांचे जुळले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:45 AM

महिला तक्रार निवारण केंद्रात वर्षभरात गेलेल्या ६८० पैकी ३११ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून पती-पत्नी घटस्फोटापर्यंत जातात. परंतु, हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात वर्षभरात गेलेल्या ६८० पैकी ३११ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. मोबाईलवरील संभाषण मॅसेज, संशय अशी विविध किरकोळ कारणे, घरातील पती-पत्नीच्या वादासाठी कारणीभूत ठरत आहेत.सन १९९६ पासून जालना पोलिसांतर्फे, महिला तक्रार निवारण केंद्र तालुका जालना पोलीस ठाण्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीला जनजागृती व माहितीचा अभाव असल्याने तक्रारींची संख्या खूपच कमी होती. १९९६ साली ३५ अर्ज आले होते. पैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात तक्रार निवारण केंद्राला यश आले होते. त्यानंतर या कामगिरीत वाढ होत गेली. एकाने दुसऱ्याला, दुस-याने तिस-याला सांगत गेल्याने आज तक्रारींचा आकडा ६०० वर गेला आहे. हाच धागा पकडून पती- पत्नींमध्ये कोणत्या कारणावरून वाद होतात. याचा आढावा महिला मुक्ती दिनानिमित्त बुधवारी ‘लोकमत’ने घेतला आहे. यावेळी संशय, मोबाईल व ईगो या कारणावरून सर्वात जास्त भांडणे होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी दोघांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करीत पुढे निर्माण होणाºया दुष्परिणामांची जाणीव करुन दिली जाते. या समुपदेशनामुळे मागील १ वर्षात जिल्ह्यात ६८० प्रकरणांपैकी ३११ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या प्रमुख सहायक पोकाँ. व्ही. ए. यमपुरे, पोकाँ. एम. ए. गायकवाड, हे. कॉ. नझीम शेख, महिला जिजा पवार, शोभा राठोड, सुकन्या बोराडे आदींनी यशस्विरित्या पार पाडत आहेत.असे होते समुपदेशनसुरूवातीला पीडितेची तक्रार तिच्या हस्ताक्षरात घेतली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला महिला तक्रार निवारण केंद्रातून संबंधित पोलीस ठाण्यातर्फे नोटीस पाठविली जाते. ठरलेल्या तारखेस हजर राहण्यास सांगितले जाते. दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची अडचण जाणून घेतली जाते. त्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याविषयी माहिती दिली जाते. चांगल्या- वाईट परिणामांची जाणीव करून दिली जाते. वारंवार तारीख देऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्या जातो. तरीही प्रकरण मिटले नाही तरी संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले जाते.मान सन्मानाची अपेक्षामहिला तक्रार निवारण केंद्रामध्ये आलेल्या अर्जांमध्ये सुशिक्षितांचाही मोठा सहभाग आहे. दोघांचेही जेमतेम शिक्षण झाल्याने दोघांनाही एकमेकांकडून मान सन्मानाची अपेक्षा असते. परंतु ते न मिळाल्यास त्यांच्यातील ईगो दुखावतो. त्यामुळे त्यांच्यात वाद होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :FamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपPoliceपोलिस