विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुधाळ जनावरांची अचून नोंद व्हावी, यासाठी मागील वर्षापासून पशुसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांच्या कानावर बारा अंकी क्रमांकाचा बिल्ला (आधार कार्ड ) लावल्या जात आहे. सध्या स्थितीत जालना जिल्ह्यातील ३४ हजार ५०० दुधाळ जनावरांच्या कानावर हा बिल्ला (आधार कार्ड) बसविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व दुधाळ जनावरांना हा बारा अंकी क्रमांक दिल्यानंतर सर्व माहिती इनाफ संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येणार आहे.माणसांप्रमाणे दुभत्या जनावरांची ओळख तयार व्हावी, यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ही मोहीम मागील वर्षापासून हाती घेण्यात आली आहे. यात दुधाळ जनावरांचे कान टोचून बारा अंकी क्रमांकाचा बिल्ला जनावराच्या कानावर लावल्या जातो. दरम्यान बिल्ला लावलेल्या जनावराची मुलभूत माहिती घेतली जाते. यात जनावर दूध किती देते, मालकाचे नाव काय आहे. आदी माहिती गोळा करून ती संगणक प्रणालीवर नोंदविण्यात येत आहे. यामुळे भविष्यात पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी हा विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला असणे अनिवार्य राहणार आहे. ही बारा अंकी युनिक ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड फायबरचे आहे. म्हणजेच न तुटणारे. कान कापला किंवा जनावर दगावल्यावर हा टॅग निघेल.ंसाडेचौतीस हजार जनावरांना बिल्लेसन २०१२ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यात ९२ हजार ९२७ दुधाळ जनावरे असून आधार कार्डच्या धर्तीवर ही मोहीम राबविली जात आहे. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन टप्यात ६४ हजार ५०० बिल्ले पशु संवर्धन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील ३४ हजार ५०० जनावरांचे कान टोचून हे बिल्ले लावण्यात आले आहेत.तसेच सध्या स्थितीत पशु संवर्धन विभागाच्या जिल्ह्यातील १०४ संस्थांमार्फत हे बिल्ले लावण्याचे काम केल्या जात आहे. येणाºया चार महिन्यात हे कामकाज पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.छावणीत कान टोचणीची विशेष मोहीमजिल्ह्यात २४ चारा छावण्यांपेक्षा अधिक चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यातील जनावरांची योग्य नोंद व्हावी, यासाठी यातील दुधाळ व इतर जनावरांनाही बिल्ला मारण्याचे काम सुरू आहे. यातील दुधाळ जनावरांना १२ अंकी बिल्ला पशु विभागातर्फे दिला जात आहे. तर इतर जनावरांसाठी १० अंकी नंबरचा बिल्ला चारा छावणी मालक उपलब्ध करून देत आहे. यानंतर पशु संवर्धन विभागातर्फे हा बिल्ला जनावरांच्या कानावर लावला जात आहे.
३४५०० दुधाळ जनावरांना ‘आधार कार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:41 AM