लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातून जात असून, यासाठी २५ गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. पैकी पाच गावांतील खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर २४ गावांतील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील गेवराई आणि अकोला निकळक येथील सहा शेतकºयांनी बुधवारी खरेदीखत लिहून दिले आहे. या सहा शेतक-यांना मावेजापोटी ३ कोटी ४१ लाख ८१ हजार १०४ रुपये देण्यात आले आहेत.जालना तालुक्यातील १५ आणि बदनापूर तालुक्यातील १० गावांतून मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्ग जात आहे. यापैकी पाच गावांतील भूसंपादन प्रक्रिया व खरेदी खत पूर्ण झालेले आहे. दोन्ही तालुक्यांतून मिळून ४४० हेक्टर २० आर जमीन संपादित करण्यात येणार असून, ११५४ लाभार्थींची संख्या आहे. पैकी २०२ शेतकºयांनी खरेदीखत करुन दिले आहे. यापोटी १०३.४५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर उर्वरित ३३६. ७५ हेक्टर जमिनीचे संपादन बाकी असून, ९५२ शेतकºयांचे खरेदीखत होणार आहे. ही प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या सहा शेतकºयांचे रितसर खरेदीखत करुन त्यांना मावेजा देण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सहाही शेतकºयांना मावेजाचे वाटपच्सदाशिव भगवंतराव गाढे यांच्या एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. मावेजापोटी त्यांना एक कोटी ३२ लाख ३३ हजार १५८ रुपयांचा देण्यात आले आहे.च्तेजराव नाथजी गिते याना ०.३७ हेक्टरचा मावेजा ४२ लाख ७९ हजार ६१४ रुपये, उद्धव जगन्नाथ गिते यांना ०.३७ हेक्टर जमिनीसाठी ४३ लाख १४ हजार ५१७ रुपये, जगन्नाथ तात्याबा गिते यांना ०.३५ हेक्टर जमिनीसाठी ३८ लाख ५६ हजार ९८४ रुपये, विष्णू रामभाऊ गिते (सर्व रा. अकोला) यांना ०.४७ हेक्टर जमिनीसाठी ४२ लाख ३० हजार ५३० रुपये आणि गेवराई येथील सरस्वती ढकणाजी पवार यांना ०.६४ हेक्टर जमिनीसाठी ४२ लाख ६६ हजार ३०१ रुपयांचा मावेजा बुधवारी देण्यात आला.
‘समृद्धी’साठी ४ खरेदीखत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:22 AM