जालना : विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. जालना पोलीस दलातील एकूण ५७ जणांच्या बदल्या पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी शुक्रवारी केल्या. यामध्ये सपोउपनि, पोहेकॉ, पोना व पोशि. आदींचा समावेश आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, शाखा येथे नेमणूक असलेल्या कर्मचा-यास नियुक्तीच्या ठिकाणी सलग पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या केल्या. पोलीस मुख्यालय येथील बँडमिंटन हॉल येथे समक्ष बोलावून ५७ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती. दरम्यान, बदल्यांचे आदेश तात्काळ काढण्यात येणार आहे.कर्मचा-यांना लेखी सूचनाबदली झालेले पोलीस कर्मचारी बदली ठिकाणी हजर न झाल्यास त्यांच्या बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीस स्थगिती देणे अशा विनंतीचा विचार केला जाणार नाही. या संबंधीत कर्मचा-यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.ठाणे शाखा प्रभारी अधिका-यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याला, शाखेस हजर झालेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे व त्यांच्या पोस्टे. शाखेतून बदली ठिकाणी कार्यमुक्त केलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे हजर झालेल्या कार्यमुक्त केलेल्या दिनांकासह पोलीस अधीक्षक कार्यालयास कळवावी.बदली आदेशात नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचा-यांना नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यापुर्वी त्यांनी त्यांच्याकडील तपासावरील प्रलंबित सर्व गुन्हे, वरिष्ठ अर्ज, स्थानिक अर्ज आणि इतर सर्व प्रलंबित प्रकरणे प्रभारी अधिकाºयांनी स्वत:कडे घेऊनच कार्यमुक्त करावे.
जालना जिल्ह्यात ५७ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:22 AM