अनेक जण सर्दी, खोकला आणि ताप असेल तर नेहमीच्या डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या-औषधी घेतात. परंतु अधिकचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांना सांगत नाहीत. त्यामुळेदेखील रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे थांबवण्यासाठी आता सरकारी रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेताना रुग्णाने या आधी कुठल्या डॉक्टरांना दाखविले आणि इलाज घेतले याची हिस्ट्री तपासण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिले आहेत.
दरम्यान, जालना येथील कोविड तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ३६० पेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजची गरज असून, तो त्यांना सध्या तरी पुरविला जात आहे. खासगी रुग्णालयांतही आता बऱ्यापैकी ऑक्सिजन असल्याने चिंता कमी झाली आहे. परंतु येत्या आठवड्यात पुन्हा ऑक्सिजनसाठी धावाधाव होईल असे सांगण्यात येते.