शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

घनसावंगी तालुक्यात ७३२ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:29 AM

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात आजवर ५,४६७ जणांना कोरोनाची ...

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात आजवर ५,४६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४,६७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८६ गावांतील ७३२ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून घनसावंगी तालुक्यात १४० गावांमध्ये ५,४६७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ४,६७४ जणांनी कोरोना मात केली आहे, तर सध्या ७३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

यात घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ २५, कंडारी (परतूर) १९, देवडी हदगाव ८, जिरडगाव १२, मासेगाव ११, माहेर जवळा ६, भादली ६, गुंज २९, राजा टाकळी ७, धामणगाव ७, नाथनगर ४६, नागोबाचीवाडी १०, पिंपळगाव ६, विठ्ठलनगर ४, भोगगाव १५, तीर्थपुरी २६, कंडारी (अंबड) ९, दैठणा खुर्द ६, बोडखा, खालापुरी, दहिगव्हाण, शेवगळ येथे प्रत्येकी ८, राणी उंचेगाव २५, शिंदे वडगाव ६, तळेगाव ७, मंगू जळगाव ११, आंतरोली ताई ५, देवी दहेगाव ६, मच्छींद्रनाथ चिंचोली १४, लिम्बी १३, लिंबूणी ११, पिंपरखेड ६, आरगडे गव्हाण १३, जांबसमर्थ १०, कोठाळा १४, एकलहरा १३, साकळगाव १५, घनसावंगी ५०, घाणेगाव ६, मंगरूळ १०, राजेगाव १०, कुंभार पिंपळगाव ३९, सिंदखेड १२, रामगव्हाण १५, रांजणी, येवला, राजंणी वाडी, शिवणगाव, ऊकडगाव, मुरमा, घोणसी खुर्द, घोंशी बुद्रुक, मांदळा, दैठणा बुद्रुक, खडका, बाचेगाव, बानेगाव, बोलेगाव, शेवता, गाढे सावरगाव, सरफ गव्हाण, भेंडाळा तांडा, मानेपुरी, मूर्ती, लिंगशेवाडी, प्रत्येकी ३, यावल पिंपरी, हातडी, रामसगाव, वडी रामसगाव, नाईक पाडळी येथे प्रत्येकी ४, कोकाटे हादगाव ७, चापडगाव ५, गुरूपिंपरी ५, आंतरवाली राठी, देव हिवरा, तनवाडी, सूतगिरणी, कुंभार पिंपळगाव तांडा, पानेवाडी, प्रत्येकी २, पांगरा, देवनगर तांडा, लमानवाडी, बोरगाव, पारडगाव, खापरदेव हिवरा, बोधलापुरी, मोहपुरी, भायगव्हाण, भेंडाळा, जोगलादेवी, रावणा, आवलगाव, मुडेगाव, निपाणी पिंपळगाव येथील प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू आहे.

६१ जणांचा मृत्यू

घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ६१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी नागेश सावरगावकर यांनी दिली. यात घनसावंगी ६, साकळगाव ३, तीर्थपुरी ३, गुंज, धामणगाव, नाथनगर, बोरगाव, मुरमा, आंतरवाली टेंभी, पिंपरखेड, गुरु पिंपरी, चापडगाव, प्रत्येकी २, कोठीगाव ३, रांजणी पांगरा, कंडारी (परतूर), देवडी हदगाव, जिरडगाव, माहेर जवळा, यावल पिंपरी तांडा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.

२.५८ टक्के संक्रमण

घनसावंगी तालुक्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २ लाख ११ हजार १०८ एवढी आहे. तर घनसावंगी शहराची लोकसंख्या ७,५२५ एवढी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केल्यास संक्रमणाचे प्रमाण २.५८ टक्के एवढे आहे.