शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:52 AM

पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.दोन महिन्यापूर्वी लघू पाटबंधारे विभागाच्या येथील विभागाने पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले होते. या संदर्भात नुकतीच दिल्ली येथे बैठक होऊन विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील ८३ लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात केंद्र सरकारचे अर्थसाह्य मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदीविकास योजनेतून या प्रकल्पांना निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.भोकरदन तालुक्यातील पळसखेडा प्रकल्पासाठी १७२८.८६ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. यातून ७.८३ द.ल.घ.मि. एवढे पाणी या प्रकल्पामध्ये साठविता येणार असून, त्यातून ५७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मंठा तालुक्यातील पाटोदा येथील प्रकल्पासाठी ८४.७५ लाख रुपये मिळणार असून, यातून ८.६०७ द.ल.घ.मी. साठवण क्षमता निर्माण होणार असून, जवळपास ११०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. खोराड सावंगी या प्रकल्पासाठी १५१८.२१ लाख रुपये मिळणार असून, यातून २.५५ द.ल.घ.मी. पाणासाठा निर्माण होईल.या पाणीसाठ्याच्या माध्यमातून २५४ हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. जालना तालुक्यातील हातवन लघू प्रकल्प पूर्णत्वासाठी ३७३१७.१७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, यामध्ये १५.०३ द.ल.घी. साठवण क्षमता निर्माण होईल. या माध्यमातून परिसरातील जवळपास १६७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील बरबडा प्रकल्पासाठी १९७७६.८५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, या माध्यमातून ११.६ द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. यातून १२२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. जाफराबाद तालुक्यातील सोमखेडा येथील प्रकल्पासाठी ३८४९ कोटी रुपये अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ३.६२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होईल, त्यातून ४४५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आता ही कामे किती लवकर सुरू होतात, याकडे लक्ष आहे.सध्या जालना जिल्हा हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे केंद्र बनले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे असून,बबनराव लोणीकरांच्या रूपाने एक कॅबिनेट मंत्री तर अर्जुन खोतकऱ्यांच्या रूपाने एक राज्यमंत्री अशी सत्ता केंद्र असल्याने या प्रकल्पांना गती मिळेल.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना