लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दिवसेंदिवस हिंसक प्राण्यांचा वावर वाढत चालला असून यंदा एप्रिल ते ७ डिसेंबर या कालावधीत २९ पशुंची हिंसक प्राण्यांनी शिकार केली आहे. तर १२ मणुष्यावर हल्ला केला आहे. यात बिबट्याच्या हल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.बिबट्या, लांगडे, डुक्कर, यांनी यंदा सात महिन्याच्या कालावधीत शेळ््या, मेंढ्या, गाय, कालवडी, गोºहे इ. २९ पशूंवर हल्ला केला आहे. यातील सर्वच प्राणी दगावले असून पशुपालकांना शासनातर्फे आर्थिक मदत दिली आहे. तसेच १२ मनुष्यांवर या हिंसक प्राण्यांनी हल्ला केला आहे. यात एक जण दगावला आहे.गावांमध्ये अस्वच्छता असते. त्यामुळे गावात डुकरे, कुत्रे यांची संख्या जास्त आहे. वनामध्ये हिंसक प्राण्यांना अन्न न मिळाल्यास बिबट्या, लांडगे , कुत्रे व डुकरे यांच्या आशेने गावाकडे जातात. परंतु, त्यांची नागरिकांध्ये दहशत पसरते.
८ महिन्यांत २९ पशु बनले वन्य प्राण्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:41 AM