दरम्यान, आता कोरोनाचे रुग्ण वाढण्यासह मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर गांधीनगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व अंत्यसंस्कार शासनाकडून केले जात आहेत. त्यात पालिकेची भूमिका महत्त्वाची असून, येथे अंत्यसंस्कारासाठी असलेले शेड तसेच ओटे अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून येथे अतिरिक्त शेड उभारणीसाठी विशेष बाब म्हणून निधी देण्याची मागणी केली होती. हा त्यांचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.
चौकट
पर्यावरण रक्षणास होणार मदत
विद्युत शववाहिनी उभारण्यासाठी पालिकेस ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे. ही शववाहिनी उभी झाल्यास मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे आणि गोवऱ्यांची बचत होऊन एक प्रकारे पर्यावरण रक्षणास मदतच होणार असल्याचे नितीन नार्वेकर म्हणाले.