लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत.यापुढे जे शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देणार नाहीत, त्यांच्यासाठी आता नवीन भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी झाली आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास २५ गावातून ४२ किलोमीटर एक्सप्रेसवे जाणार आहे. त्यासाठी जालना, बदनापूर या तालुक्यातील शेतक-यांची जवळपास ४३४ हेक्टर तर सरकारी जमीन ही ७६ हेक्टरचे संपादन केले आहे.आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक शेतक-यांना जमिनिच्या खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले आहेत. या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केवळ कार्यारंभ आदेश मिळाल्यावर लगेचच या महामार्गाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे तहसीलदार एस.व्ही. सोनवणे यांनी दिली.१५ जूनपर्यंत हरकती आणि दावे मागविलेदरम्यान राज्यपालांनी जो नवीन भूसंपादनाचा कायदा केला आहे, त्याची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात १५ जून पर्यंत हरकती आणि दावे मागवण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत आक्षेप दाखल न केल्यास आणि आलेल्या आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास लगेचच सक्तीने भूसंपादन करून, संबंधित शेतक-यांच्या नावे जी किंमत त्यांच्या शेतीची होणार आहे, ती रक्कम न्यायालयात जमा होईल.
‘समृध्दी’साठी ८० टक्के भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:40 AM