दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या विविध भागातील कामकाजाबाबत जिल्हाभरातून १०१३ तक्रारी धडकल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आजवर ९५४ तक्रारींचे निराकारण केले. तर ५९ तक्रारी चौकशीवर असून, त्याही लवकरच निकाली लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा परिषद कार्यालयात १० विभाग आहे. यात पंचायत विभाग, शिक्षण प्राथमिक, शिक्षण माध्यमिक, महिला व बालकल्याण, डीआरडीए, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, सिंचन, समाज कल्याण, वित्त विभाग, सामान्य प्रशासन व कृषी विभाग या विभागांचा समावेश आहे.या सर्व विभागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक दररोज आपली कामे घेऊन येतात. परंतु, अधिकारी व कर्मचारी त्यांची कामे करत नसल्याचा आरोप सतत होतो. काम होत नसल्याने अनेक नागरिक याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करतात. मागील वर्षभरात जिल्हा परिषदेकडे सर्व विभागांच्या १ हजार १३ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील काही तक्रारी या आॅनलाईन पध्दतीने आल्या आहे. तर काही तक्रारी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. या तक्रारींची जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यातील ९५४ तक्रारींचे निवारण केले आहे.तर ५९ तक्रारी अद्यापही प्रलंबीत आहे. काही तक्रारींची चौकशी करण्यात सुरु असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.सिंचन, शिक्षण विभागावर सर्वात जास्त रोष१ हजार तक्रारीपैकी जवळपास १५० ते २०० तक्रारी या शिक्षण विभागाच्या आल्या आहे. तर त्यापाठोपाठ सिंचन विभागाच्याही तक्रारी आहे. त्यामुळे या दोन विभागांवर नागरिकांचा सर्वाधिक रोष असल्याचे चित्र आहे.तक्रारींचे स्वरुपनमूना नंबर ८ न देणे, सेवा वेतन न देणे, दलित वस्तीच्या कामात भष्ट्राचार करणे, टँकर सुरु न करणे, शौचालयाच्या कामासाठी निधी न देणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी झेडपीकडे प्राप्त झाल्या आहेत.प्रलंबित तक्रारीपंचायत विभाग ७, शिक्षण विभाग (प्राथ) ४, शिक्षण विभाग (माध्य) ३, महिला व बाल कल्याण १, डीआरडीए १, ग्रामीण पाणी पुरवठा १, बांधकाम विभाग २, समाजकल्याण विभाग २ तर बीडीओ जालना ७, बीडीओ भोकरदन ६, बीडीओ घनसावंगी ७, बीडीओ मंठा ९, बिडीओ जाफराबाद ८, बीडीओ अंबडच्या १० तक्रारी प्रलंबित आहेत.
१ हजारांपैकी ९५४ तक्रारींचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:06 AM