- फकिरा देशमुखभोकरदन: राजूर हुन दर्शन करून परत येत असताना दुचाकीला झालेल्या भिषण अपघातात भोकरदन शहरातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. विशेष म्हणजे हे चौघे एकाच दुचाकीवर होते.
या बाबतची माहिती अशी की 10 जानेवारी रोजी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान दुचाकीला झालेल्या अपघातात भोकरदन येथील निलेश हिरालाल चव्हाण वय 20,प्रशांत आरके वय 21, हे दोन तरुण जागीच ठार झाले तर अनिकेत बाळू वाहुळे वय 19,आरेफ सलीम कुरेशी वय 22 रा नवे भोकरदन हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर तरुण हे दुचाकीवर राजूरला गेले होते व राजूरहून भोकरदन कडे येत असताना राजूर भोकरदन रस्त्यावरील टेपले पेट्रोलपंपा जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये निलेश चव्हाण व प्रशांत आरके हे दोघे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच हसनाबादचे सपोनि संतोष घोडके, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, पोलिस कर्मचारी गणेश माटे, राजू वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वाना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येेेथे डॉक्टटरांनी तपासून प्रारश्प्रं व निलेश याला मयत घोषित केले. तर अनिकेत वाहूळे व आरेफ कुरेशी यांच्यावर प्राथमिक ओषध उपचार करून जालना येथे हलविले. मात्र दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या प्रकरणात राजूर पोलिस चोकीत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगारकी चतुर्थी असल्याने असंख्य भाविक दर्शनासाठी राजूरला पायी जात होते अपघात झाला त्यावेळी या भाविकांनी सुध्दा अपघातातील जखमींना मदत केली या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती मात्र पोलीसांनी या गर्दीला आटोक्यात आणले. भोकरदन पोलिसांनी राजूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून भोकरदन - जालना रस्त्यावरील जड वाहनांना हा रस्ता बंद केला होता