लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द झालेल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी तब्बल ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. तर यादीतील आधार क्रमांक चुकल्याबाबत ६७४ शेतक-यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या पहिल्या यादीत टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील ११०२ शेतक-यांची नावे होती. तर दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांची नावे समाविष्ठ करण्यात आली होती. याद्या जाहीर झाल्यापासून आजवर ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ६७५ शेतक-यांनी आधार क्रमांकाबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. पैकी राष्ट्रीयीकृत बँकेतील ५४३ शतक-यांचे ४ कोटी ९१ लाख रूपये कर्जखात्यात जमा झाले आहेत.शासनाच्या दोन्ही याद्यांमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या ८१ हजार ८१६ शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण होणे अद्याप बाकी आहे. या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. तर शेतक-यांकडून दाखल होणा-या तक्रारींचे तात्काळ निरसण करण्याची प्रक्रियाही केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांची यादी येण्याची शक्यता आहे.
५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:11 AM