शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

आदिवासी आश्रमशाळेतील ६८१ शिक्षकांची तपासणार क्षमता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 4:44 PM

यावल प्रकल्प कार्यालयातर्गंत येणाऱ्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळा मध्ये कार्यरत ६८१ शिक्षक क्षमता चाचणी परिक्षेसाठी बसणार आहेत.

कुंदन पाटील

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. चोपडा येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर जिल्ह्यातील ६८१ शिक्षक क्षमता चाचणी देणार आहेत. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे. 

आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दींगत व्हावे, त्यांना स्व:अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी, ह्या उद्देशाने क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

५० बहुपर्यायी प्रश्न

क्षमता चाचणी एससीईआरटी व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. क्षमता चाचणी करिता कला व विज्ञान शाखेचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता १ ली ते ७ वी, दुसरा गट - ८ वी ते १० वी, तिसरा गट - इयत्ता ११ वी व १२ वी असे आहेत. क्षमता चाचणी १०० गुणांची असणार असून त्यामध्ये एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यापैकी ७० टक्के प्रश्न हे विषयावर आधारित असतील व ३० टक्के प्रश्न हे सामान्य ज्ञान, मानसिक क्षमता व चालू घडामोडी यावर आधारित असतील.

४९ आश्रमशाळांचा सहभाग

यावल प्रकल्प कार्यालयातर्गंत येणाऱ्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळा मध्ये कार्यरत ६८१ शिक्षक क्षमता चाचणी परिक्षेसाठी बसणार आहेत. क्षमता चाचणी परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे,  शिक्षकांना अद्ययावत विषय ज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे हे या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. यावल प्रकल्पातील सर्व शिक्षकांनी कोणतीही भीती न बाळगता क्षमता चाचणी परीक्षा मोठ्या संख्येने द्यावी. असे आवाहन पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव