शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लग्न महिन्यावर असताना होणाऱ्या पत्नीवर अत्याचार, केला खून; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 6:04 PM

तीन महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा; तरुणास पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात

जालना : लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने होणाऱ्या पत्नीचा अत्याचार करून गळा चिरून खून केल्याची घटना मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडली होती. दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर) हा फरार झाला होता. मोबाईलच्या लोकेशनद्वारे शोध घेऊन त्याला वसई उपनगर भागातील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे.

बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून सुशील पवार याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला होता. या प्रकरणी मयत मुलीचे वडील संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित सुशील पवार (रा. वरूड, ता. मेहकर) याच्याविरुद्ध अत्याचार, खुनासह पोक्सोअंतर्गत सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सेवली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता, तो मुंबई येथील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती सेवली पोलिसांना मिळाली. 

या माहितीवरून सेवली पोलिसांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सेवली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला जालना येथे आणले जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्यासह सपोनि. नित्यानंद उबाळे, पोलिस कर्मचारी धनंजय लोढे, संतोष चव्हाण, भागवत कदम, शिपाई काळे यांनी केली आहे.

वाट पाहिली नवरदेवाची...वार्ता आली नवरीच्या खुनाची१८ फेब्रुवारी रोजी बस्ता बांधण्यासाठी वर व वधूकडील मंडळी दुसरबीड येथे गेले. सपनाचे आई-वडील, काका यांच्यासह १२ ते १३ जण दुसरबीड येथे गेले होते. दीड वाजेच्या सुमारास सुशीलचे आई-वडील, मामा, मावसा, काका तेथे आले. त्याचवेळी सपनाच्या वडिलांनी सुशीलबाबत विचारणा केली, तेव्हा नातेवाइकांनी तो दुचाकीवर येत आहे, असे सांगितले. सर्वांनी सुशीलची वाट पाहिली. काही वेळानंतर सुशीलचा भाऊ अमोल याने त्याला फोन केला; परंतु त्याचा फोन बंद होता. बस्ता बांधण्यासाठी वर व वधूकडील मंडळी नवरदेवाची वाट पाहत होते; परंतु तेवढ्यात फोन आला अन् नवरीच्या खुनाची बातमी नातेवाइकांच्या कानावर पडली. त्यानंतर सर्वच नातेवाईक थेट बेलोरा येथे आले. घरात पाहिले असता, सपना हिचा गळा चिरलेला दिसला. तिचे कपडेही अस्ताव्यस्त पडलेले होते. 

तीन महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा बेलोरा येथील संदीप जाधव हे शेती करतात. त्यांना एक मुलगी, दोन मुले आहेत. सपनाचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर ती घरीच होती. सपना हिचा तीन महिन्यांअगोदर मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार याच्याशी विवाह जुळला होता. २० डिसेंबर २०२२ रोजी बेलोरा येथे त्यांचा सारखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघेही खुश होते. याच कार्यक्रमात मुलाला दीड लाख रुपये देण्यात आले.  नंतर दोघेही जण एकमेकांना फोनवर बोलत होते. सुशील हा दोन ते तीन वेळा सपनाला भेटण्यासाठी आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना