शहागड (जालना ) : एकादशीनिमीत्त पंढरपूर येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांचा टेम्पो उलटल्याची घटना शहागडजवळ आज सकाळी घडली. यात उलटून २५ भाविक जमखी असून पाच भाविकांची प्रकृती गंभीर आहे.
पैठण येथून दरवर्षी भाविक एकादशीनिमीत्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. बुधवारी भागवत एकादशी असल्याने पैठण, नवनाथ, अंबड टाकळी, हिरडपुरी, विहामांडवा येथील ४५ भाविक टेम्पो क्रमांक एम.एच.२० ए.टी. ८८६० शहागड मार्गे पंढरपुरला सकाळी निघाले होते. शहागड - पैठण रस्त्यावर सुसाट जात असलेल्या टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. टेम्पोमध्ये ४५ भाविका असल्याने एकामेकाच्या अंगावर पडून तर काहीजण रस्यावर फेकल्या गेल्याने जखमी झाली.
जवळपास पंचवीस भाविक यात जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना गंभीर दुखापत आहे. अपघात झाल्याची माहिती कळतात परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्यकरुन जखमींना शासकीय रुग्णवाईकेतून अंबड आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जखमींची नावे : जखमीमध्ये महिला, वयोवृध्द महिला, जेष्ठ पुरुष होते. टेम्पो चालक गणेश साठोडे (रा.हिरडपुरी), रामदास कोंडीबा जेधे (रा. विहामांडवा), कौसाबाई अंकुश हेंगरे (रा. विहामांडवा), सुरेखा गोरख जेधे (रा. विहामांडवा), देऊबाई कुंडलिक इंगळे (रा. विहामांडवा), ज्ञानदेव चेपटे, लक्ष्मीबाई दत्तु हूके (रा. दह्याळा ता.अंबड), आसाराम रमाजी बारगजे (रा. विहामांडवा), श्रीधर पंढरीनाथ डांगे (रा. दह्याळा ता.अंबड), सोपान ज्ञानदेव सिरसाट (रा. पैठण), विजय मुरलीधर तांबे (रा. हिरडपुरी), अयोध्या शहादेव माने (रा. विहामांडवा ), शहादेव बडे (रा. टाकळी अंबड), रविंद्र आसाराम तांबे (रा. हिरडपुरी), लक्ष्मी जनार्दन गारूळे (रा. दह्याळा ता.अंबड), विष्णू जाधव (रा. हिरडपुरी), सूर्यभान गोविंद सिरसाट (रा. पैठण), भगवान प्रभाकर गांधले, रामनाथ दादा तांबोरे (रा. हिरडपुरी) सर्व ता.पैठण अशी जखमींची नावे आहेत.