या चौफुलीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येकजणच वेगात वाहने चालवत असतो, त्याचा परिणाम हा अपघात होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे. नवीन रस्त्यांमुळे कोण कुठून येत आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आधी येथे भगवती पुरोहित संघाने पुढाकार घेऊन गतिरोधक बसविले होते. त्यानंतर अपघात कमी झाले हाेते याची आठवण पुरोहित संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी करून दिली. हे गतिरोधक पुन्हा बसविल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल.
सिग्नल व्यवस्था गरजेची
जालन्यातील या अंबड चौफुलीवर स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्याची गरज असून, त्यामुळे ही यंत्रणा २४ तास सुरू राहिल्यास मोठा परिणाम होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. हा राज्यमार्ग असल्याने येथे सिग्नल अथवा स्पीडब्रेकर बसविता येत नाहीत. परंतु काही ठिकाणी नियमांना अपवाद करून तेथे चारही बाजूंनी गतिरोधक न बसविल्यास अनेक अपघात होऊन अनेकांचे हकनाक बळी जातील असे सांगण्यात आले.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे
अंबड चौफुलीवर गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यात दोन वर्षांत २८ जणांचे बळी या चौफुलीवरील अपघाताने घेतले आहेत. त्यामुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून येथे तातडीने गतिरोधक बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे.
------------------------------------------------------