जालना : शहरातील लक्ष्मण उंबरे (रा. चंदनझिरा) यांचा गुरूवारी दुपारी खून झाला होता. या प्रकरणातील फरार झालेल्या श्याम ऊर्फ रमेश चिकटे (२७, रा. मटणगल्ली, चंदनझिरा) व जितेंद्र रवि आरसूळ (२९, रा. बदनापूर) या दोघा संशयित आरोपींना गुरूवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी दुपारी दोघांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील आरोपी श्याम चिकटे याने पाणी पिण्याचे निमित्त करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. जालना शहरातील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मण उंबरे यांचा पैशाच्या देवाण -घेवाणीवरून गुरूवारी दुपारी श्याम चिकटे व जितेंद्र आरसूळ यांनी खून केला होता. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गुरूवारी रात्री एकास चंदनझिरा, तर एकास बदनापूर येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस काेठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दोघांनाही चंदनझिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील श्याम ऊर्फ रमेश चिकटे याने पाणी पिण्याचे निमित्त करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह कर्मचारी आरोपीच्या मागावर आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना आरोपी मिळाला नव्हता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाणी पिण्याचे निमित्त करून खुनातील आरोपीने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 7:23 PM
crime news in jalana जालना शहरातील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मण उंबरे यांचा पैशाच्या देवाण -घेवाणीवरून गुरूवारी दुपारी खून झाला होता.
ठळक मुद्देदुपारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस काेठडी सुनावण्यात आली. यातील श्याम ऊर्फ रमेश चिकटे याने पाणी पिण्याचे निमित्त करून पोलीस ठाण्यातून पळ काढला.