दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांना शहर वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत ११ हजार ९७० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया कारवाईत वाढ झाल्याचे समोर आले आहे.शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडत आहे. वाहतूक नियम न पाळणाºया वाहनचालका विरोधात शहर वाहतूक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येते. यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ११ हजार ९७० वाहनचालकांवर कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत यावषी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान नियम मोडणाºया ७ हजार ७४३ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून १७ लाख ६९ हजार ५० रुपये दंड वसूल केला होता. दरम्यान, यामुळे वाहतूकीचे नियम मोडणाºयावर वचक बसला आहे.या वाहनाधारकांवर केली कारवाई४ वाहतुक शाखेकडून गेल्या नऊ महिन्यामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली असून, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, पीयुसी प्रमाणपत्र नसणे, विना नंबर, रिक्षा चालकांना गणेवश नसणे, यासह अन्य कारणासाठी ही कारवाई करण्यात आली.
नऊ महिन्यांत ११ हजार वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:41 AM
नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांना शहर वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत ११ हजार ९७० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला.
ठळक मुद्देवाहतूक विभाग : २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल