शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

जालना जिल्ह्यात वर्षभरात २३ रोडरोमिओंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने वर्षभरात २३ प्रतिबंधात्मक कारवाया ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने वर्षभरात २३ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तक्रारी आल्यानंतर कारवाई करणाऱ्या या दामिनीचा रोडरोमियोंवर वचक असल्याचे दिसून येत आहे. शहरातील दामिनी पथक सरस असून, बारा महिन्यात या पथकाने शहर व जिल्ह्यातील १९५ शाळा व ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत.शहरातील विविध शाळा महाविद्यालयांच्या आजूबाजूला रोडरोमियोंचा वावर असतो. विद्यार्थिनींना अशा रोडरोमियोंकडून छेडछाड करण्याच्या घटनाही घडतात. या छेडछाडीची तक्रार करण्यासही विद्यार्थिनी घाबरत असल्याची बाब पोलिसांना लक्षात आल्यावर २०१४ साली शहरात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाला स्वतंत्र वाहन देण्यात आले असून, महिला पोलीस अधिकां-यासह चार महिला पोलीसही या पथकात आहेत. वर्षभरात या पथकाने १९५ शाळा, ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहे. तर ४३ रोडरोमियोंना १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २३ रोडरोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची नोंद आहे.शहरात दररोज राऊंडमध्यवर्ती शहरात साधारणत: दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत शाळा कॉलेजच्या आसपास रोडरोमियोंचा सुळसुळाट असतो. दामिनी पथक यावेळी अशा शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सातत्याने राऊंड मारते. एखाद्या विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर लगेचच हे पथक घटनास्थळी जाऊन कारवाई करते.१९५ शाळा व५२ महाविद्यालयांना भेटीशहरात रोडरोंमियोंना आळा घालण्यासाठी दामिनी पथकाच्यावतीने विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या पथकाने वर्षभरात १९५ शाळा व ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहे.जालना शहरात दामिनी पथकाची स्थापना २०१४ साली करण्यात आली. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. या पथकात सहायक पोनि. नालंदा लाडंगे, सोनाली खांडेकर, आरती साबळे, ऊषा साबळे, रेणुका राजपूत, रुपाली नेवाड हे काम पाहतात. वर्षभरात या पथकाने २३ जणांवर कारवाई केली आहे.विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्याची गरजशहरातील शालेय विद्यार्थिनींना रोडरोंमियोपासून बचाव करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थींनाच आपले संरक्षण करता येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंग