शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:08 AM

शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे

ठळक मुद्देभाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन केवळ शिपायांचं निलंबन केलंय. पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी खिरडकर यांच्या कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

जालना - शहरातील एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. भाजपा नेत्यांच्या मागणीनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे. 'शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअरही करण्यात आलंय. तसेच, इतरही भाजपा नेत्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, आता संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 

जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांचा समावेश आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन केवळ शिपायांचं निलंबन केलंय. पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी खिरडकर यांच्या कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. ज्यांच्या आदेशावरुन मारहाण झाली, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

पोलीस निरीक्षक महाजन म्हणतात...

९ एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. शिवाय, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.

फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

डीवायएसपी पदावरील अधिकाऱ्याने अशा पद्धतीने मारहाण करणं हे अतिशय गंभीर आहे. तसेच, राज्यात कायद्याचे राज्य नसल्याप्रमाणे अशा घटना घडत आहेत. त्यावर, सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. समाजमाध्यमांवर किंवा भाजपा कार्यकर्ता किंवा सामान्य माणसाने एखादी प्रतिक्रिया दिल्यास कधी पोलिसांकडून, तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. अलिकडच्या काळात हे प्रकार प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरला नाही, याप्रकरणी आपण स्वत: लक्ष देऊन दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारीChitra Waghचित्रा वाघ