लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वाळू घाटांचा लिलाव नसताना उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे सहा टीप्पर आणि एक ट्रॅक्टर पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महसूल आणि पोलीस पथकांनी संयुक्त कारवाई करत सोमवारी रात्री सहा टीप्पर आणि ट्रॅक्टर पकडले.सोमवारी रात्री धामणा नदीत सहा टिप्पर, एक ट्रॅक्टर उभे असल्याचे आढळून आल्याने ते सहा टिप्पर, एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. पथकात पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, तलाठी व्ही.आर.गरड, एन. टी. वाघ,ए. एस.पवार, जी.एन. तांगडे, यांचा समावेश होता. जप्त करण्यात आलेले वाहने जाफराबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून गौणखनिज नियमानुसार दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वीही जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदीतील वाळू उपसाप्रकरणी माजी सभापती राजेश चव्हाण यांनी तक्रार दिली होती.रांजणगाव शिवारातून वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखलबदनापूर - तालुक्यातील रांजणगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी एका अनोळखी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रांजणगाव शिवारात दि २१ जाने रोजी १ वाजेच्या सुमारास दुधना नदीच्या पात्रातून अंदाजे एक ब्रास वाळू रॉयल्टी न भरता ट्रॅक्टरमधून घेऊन जात होते.हा ट्रॅक्टर नदीतून जाणा-या रस्त्यावर आढळला. तहसीलचे पथक दुसºया वाहनावर कारवाई करण्यासाठी नदीमध्ये गेले असता सदर ट्रॅक्टर घेऊन तेथून पळन गेला असल्याची फिर्याद नीलेश शिरभाते यांनी दिल्यावरून ट्रॅक्टर चालकाविरूद्ध (नाव गाव समजू शकले नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:33 AM