लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रारंभ झाला आहे. जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता आता केवळ दोनच दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिल्लक राहिले आहेत. ८ एप्रिलनंतर जालना जिल्ह्यात प्रचाराची रंगत वाढणार आहे.जालना लोकसभा मतदार संघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश असून, जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर आणि भोकरदन या विधानसभा येतात. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदार संघ येतात.लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना प्रत्येक उमेदवार सध्या भेटी-गाठींवर भर देत असून, आगामी काळात सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या सभांची तयारी आणि नियोजन सुरु असल्याचे सांगण्यात आले.रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी उन्हापासून बचावाकरिता आरोग्याची काळजी घेणे गरजे आहे. यामध्ये विशेषत: उन्हात काम करताना गॉगल, टोपी किंवा रुमाल यांचा अवश्य वापर करणे गरजेचे झाले आहे.तसेच जास्तीत-जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.हे कराल तर वाचाल?. तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, हलक्या रंगाच्या सुती कापड्याचा वापर करावा.घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे.चेहरा, डोके ओल्या कापड्याने झाकावे, शिळे अन्न खाऊ नका.ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी इ. घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे. तसेच शारीरिक क्षमाची कामे टाळावीत.भरपूर पाणी प्यावे, उन्हात जाणे टाळावेउन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, सैल आणि पांढºया, रंगाचे कपडे परिधान करावेत, उन्हाची तीव्रता बघता कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी थेट उन्हात जाऊ नये. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास, तसेच तोंड कोरडे पडणे अशी लक्षणे दिसल्यास सरबत, लिंबूपाणी, नारळ पाणी पिऊन त्यावर नियंत्रण मिळवावे, ऊन लागलेच तर घरगुती उपाय न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि उन्हात प्रत्येकाने काळजी घ्यावी.- डॉ. राजेश सेठिया
नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही कडक उन्हाचा बसणार फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:33 AM