जालना : दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यावेळी अनिल चित्तेकर हा निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या अंगावर धावून गेला व शिवागाळ केली. या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने आज निषेध करून आरोपीस अटक करण्याची मागणी करत लेखणी बंद आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने येथील कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केले होते. यावेळी अनिल चित्तेकर याने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेला. या घटनेचा येथील कर्मचाऱ्यांनी निषेध करत आज लेखणी बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी संजय चंदन, राजेंद्र शिंदे, गणेश कावळे, विनोद वाघ, संदिप देबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.