लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदारसंघात मंगळवारी लोकसभेसाठी मतदान होत आहे. याची सर्व ती तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदार संघातील संबंधित मतदान कर्मचाऱ्यांना त्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले असून, हे कर्मचारी बसने त्यांना दिलेल्या मतदान केंद्रावर रात्रीच मुक्कामाला रवाना झाले आहेत.जालना शहरातही निवडणुकीची तयारी झाली आहे. शहरात जवळपास २२६ मतदान केंद्र आहेत. सोमवारी जालन्यातील आयटीआयमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार सुधाळकर यांच्यासह पोलीस उपविगीय अधिकारी खिरडकर आदींची उपस्थिती होती. एकूणच प्रशसनाकडून पोलचिटचे वाटप करतांना मात्र गोंधळ उडाल्याचे चित्र होते. नवीन जालना तसेच जुन्या जालन्यातील काही भागात पोलचिट सोमवारी सायंकाळ पर्यंतही मिळाला नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. ज्या भागात या पोलचिट मिळाल्या नाहीत, त्याची योग्य कारणे शोधण्यात येऊन निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.शहरात पंधरा सेल्फी पॉइंटजालना शहरात मतदान केल्यानंतर त्यांना सेल्फी काढता यावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे शहरातील पंधरा विविध मतदान केंद्रांबाहेर एक स्वतंत्र सेल्फी पॉइंट स्थापन केला असून, अशी व्यवस्था प्रथमच केली जात असल्याचे सांगण्यात आलेमतदारांनी त्यांचे मतदान झाल्यावर स्वत:चा सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा नवीन फंडा अवलंबण्यात आला आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:03 AM